Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhagwan Padmeshwar | वाशिमच्या पुरातन मंदिरातील भगवान पद्मेश्वर यांना पितळी साज!
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
17 Aug 2021 04:59 PM (IST)
1
वाशिमच्या पुरातन मंदिरातील भगवान पद्मेश्वर यांना संपूर्ण पितळी साजात सजवण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वाशिम येथे राजा वाकाटकच्या काळातील हे पुरातन पद्मेश्वर मंदिर आहे.
3
पद्मेश्वर मंदिराजवळ एक पद्मतीर्थ तलाव असून या तलावात अस्थी विसर्जन केल्या जाते इतकं पवित्र हे संस्थान आहे.
4
वाशिम येथील एका स्टील व्यावसायिकांनी 5 क्विंटल पितळचा साज श्रावण सोमवार निमित्ताने दिला आणि पद्मेश्वर शिवभक्तांच्या अथक प्रयत्नातून हे साकारण्यात आले.
5
विशेष म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत अशा प्रकारचा शृंगार महादेवाला करण्यात आलेला नाही.
6
या शृंगारामुळे महादेवाला आगळं वेगळं रुप आलं आहे.
7
कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरं बंद आहेत.
8
कोरोना संकट जाऊन लवकर मंदिरं उघडी व्हावीत अशी प्रार्थना आता सर्वजण करत आहेत.