Ashadhi Wari : बोला पुंडलिका वरदे... मानाच्या पालख्यांचं एसटीनं पंढरीकडे प्रस्थान, पाहा फोटो
आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचं पंढरीकडे प्रस्थान झालं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षांपासून एसटी बसनं या मानाच्या पालख्या पंढरपूरला येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचं आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने पहाटेच्या वेळी प्रस्थान झालं.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे. सजविलेल्या दोन शिवशाही बस मधून 40 वारकरी ग्यानबा तुकारामच्या जयघोषात मार्गस्थ झाले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार टाळकरी मानकरी यांची निवड करण्यात आलीय सोबत वैद्यकीय पथकही आहे.
संत तुकोबांच्या पादुका शिवशाही एसटीत विराजमान झाल्या.
त्याआधी संत तुकोबांच्या पादुका मंदिरातून थेट इनामदार वाड्यात आल्या. इनामदार वाडा हा तुकोबांचे आजोळ घर. इथं आरती झाल्यानंतर पादुका शिवशाहीनं पंढरीकडे रवाना झाल्या.
श्री संत सोपानकाका आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज यांची पालखी आज बसने पंढरपूरकडे रवाना होणार आहे. काही वेळातच मंदिरात भजन कीर्तनला सुरुवात होणार आहे.. या नंतर शिवशाही बसने पालखी पंढरपूरकडे रवाना होईल
वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मोठा पोलिस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे
पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीनं देखील एसटीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं.