Ashadhi Wari : पहिला मान मुक्ताईचा! संत मुक्ताईच्या पालखीचं मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान, पाहा फोटो

पंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचं आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने प्रस्थान झालं.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचं राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठं मानाचं स्थान आहे.
राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघत असते. तशी ती पंढरपूर येथेही संत मुक्ताई पालखीचं पहिल्यांदा आगमन होत असतं.
गेल्या वर्षभरापासून राज्यभरात कोरोनाचं सावट पसरल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत
यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, मात्र मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.