पालघरमधील 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड
टी. एम.नाईक सरांचे वयाच्या 79 व्या वर्षी कोरोना मुळे निधन झाले पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हितेंन नाईक यांचे ते वडील होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी. एम. नाईक सर सातपाटी येथील सरकारी मत्स्योद्योग माध्यमिक शाळेचे अधीक्षक म्हणून निवृत्त झाले होते सातपाटी आणि पंचक्रोशीत 'नटसम्राट' म्हणून त्यांची ख्याती होती.
सातपाटी आणि परिसरातील ग्रामीण भागातील हौशी कलाकारांना सोबत घेऊन मागील चाळीस वर्षापासून कलासागर नाट्य मंडळातर्फे त्यांनी 'मोरूची मावशी', 'अहो मला जगायचंय', 'सौजन्याची ऐशी तैशी', 'वासुची सासू', 'काळोख देते हुंकार', 'उध्वस्त' अशी अजरामर नाटके सादर करून राज्यस्तरीय नागरी नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावताना उत्कृष्ट दिग्दर्शन अभिनय नेपथ्य प्रकाश योजना असे पुरस्कार मिळवले होते.
मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात 'नटसम्राट' हे नाटक त्यांनी अनेक भागात सादर केले. 'नटसम्राट' मधील 'अप्पा बेलवलकर' ही भूमिका ते साकारत असत.
कुसुमाग्रजांच्या अजरामर झालेल्या 'नटसम्राट' या नाटकाला पन्नास वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर विचार मंचाच्या वतीने 'नटसम्राट' स्वगत ऑनलाईन स्पर्धेत टी. एम. नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता,
दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाच्या नाट्य स्पर्धेमध्ये पालघर विभागास प्रथम क्रमांक मिळाला होता त्या नाटकाचे दिग्दर्शन सुद्धा नाईक यांनी केले होते त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील हौशी नाट्य कलाकारांचे फार मोठे नुकसान झालेच पण, झगमगाटापासून दूर असणारा एक कलावंतही सर्वांनीच गमावला आहे.