PHOTO : वसंत ऋतूच्या स्वागतासाठी बहरला पळस, केसरी फुलांच्या न्हाऊन निघाला
मेघांच्या पळसाचा अस्तावर जाळ, अस्तांच्या कंठात.....माणकांची माळ....! नेमकं काहीसं असंच दृश्य सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा, ज्ञानगंगा, आंबाबारवा या सर्व अभयारण्यात दिसत आहे. वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात बहरलेला पळस जणू काही फ्लेम ऑफ फॉरेस्ट दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल देणारा पळस सध्या सर्वत्र फुलला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्यातील जंगल केसरी रंगांच्या पळस फुलांनी न्हाऊन निघालं आहे.
वैदिक काळापासून पळसाचा उपयोग यज्ञ कर्मामध्ये केला जातो, पळसाच्या फुलांचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारी पळसाची केसरी रंगाच्या फुलांनी जंगल बहरला असल्याने सर्वत्र केसरी रंग पसरलेला दिसत आहे.
पळस फुलांचे अनेक औषधी गुणधर्म असून या परिसरातील नागरिक या फुलांचा अनेक आजारांवर औषधी म्हणून उपयोग करतात.
मूत्र मार्गाचे विकार, त्वचा रोग अशा अनेक आजारांवर पळस फुलांचा रस गुणकारी असल्याचं या परिसरातील जाणकारांनी सांगितलं.