Chandrapur : युट्युबच्या माध्यमातून गिरवले ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचे धडे
युट्युबच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट या फळशेतीचे धडे घेत शेतीचा यशस्वी प्रयोग केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवरोरा तालुक्यात राहणारे मनीष पसारे, सुमित किनाके (आबामक्ता), भूषण ठाकरे (सोनेगाव), अमोल पिसे आणि अमोल महाकुलकर (माढेळी) या पाच शेतकरी मित्रांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला.
या भागातील शेतजमीन ही मुरमाड असल्याने चना-सोयाबीन सारखी पारंपरिक पिकं फायदेशीर ठरत नव्हती.
मुरमाड जमिनीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा त्यांचा शोध ड्रॅगन फ्रुट या फळशेतीपाशी येऊन थांबला.
युट्युबच्या माध्यमातून त्यांनी या शेतीबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेतली.
लातूर-सांगोला या भागात जाऊन ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची खरेदी केली.
शेतीमध्ये बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर या रोपांची ट्रेलर पद्धतीने लागवड करण्यात आली.
सध्या या रोपांनी जोम धरला असून साधारण एक वर्षांची झाली की रोपांना फळधारणा व्हायला सुरुवात होईल.
साधारण एक एकर लागवडीसाठी त्यांना सात लाखांचा खर्च आला. पहिल्याच वर्षी चार लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.