PHOTO : सांगोल्यातील माण नदीकाठ पेंटेड स्टॉर्क पक्षांनी फुलला
सांगोला तालुक्यातील जलाशयाची पातळी कमी होत असल्याने वाढेगाव येथील माण नदीपात्रात पेंटेड स्टॉर्क अर्थात चित्र बलाक पक्षाचे थवेच्या थवे सध्या अन्नाच्या शोधात आले आहेत. यामुळे परिसर पक्षांनी फुलला असून नदीकाठचा हा परिसर पक्षीप्रेमींना आकर्षित करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेंटेड स्टॉर्क हा आशिया खंडातील पाकिस्तान, श्रीलंका, भारत या देशात आढळणारा पक्षी आहे. बगळा, रोहित पक्षी, करकोचा, आयबीस, असे सर्व परिचित असणारा पक्ष्यांच्या कुळातील हा पक्षी आहे.
दरवर्षीप्रमाणे चित्र बलाक हे पक्षी सांगोला तालुक्यातील बहुतांश जलाशयावर आढळून येतात.
जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर मोठ्या संख्यने मासे खाण्यासाठी पाण्यात आपली चोच उघडी करुन शोधत असतात.
सांगोला तालुक्यातील वाढेगाव याठिकाणी माणनदीच्या पात्रात मार्च ते मे या दरम्यानच्या काळात पाण्याची पातळी कमी झाल्याने खूप मोठ्या संख्येने एकत्र येतात. 5
त्याचबरोबर चमचे, शेकाट्या, बगळे, पानलावा, प्रीत, खंड्या इत्यादी पक्षीही मोठ्या प्रमाणात एकत्र वावरताना हे दृश्य खूप विलोभनीय दिसते.
सांगोला शहराच्या आसपास असलेल्या चिंचोली तलाव, ब्रह्मओढा या ठिकाणीही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दरवर्षी मार्च ते मे या काळात पाहावयास मिळतात. पक्षीप्रेमींसाठी हे पक्षी आकर्षण ठरत असतात.