In Pics | उत्तर अमेरिकेच्या रेड नेक फॅलेरॉप पक्षाचे पालघरमध्ये दर्शन, पाहा फोटो
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आणि उथळ पाणथळ भागात दर वर्षी विविध देशी विदेशी पक्षी पाहायला मिळतात. साधारपणे थंडीच्या मोसमात अशा विदेशी पक्षांच्या स्थलांतराला सुरुवात होते. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी विविध देशांत भ्रमंती करत असतात,थंडी कमी होताच पुन्हा हे पक्षी आपल्या माय देशी परतण्यासाठी परतीचा प्रवास करतात. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)
हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी विविध देशांत भ्रमंती करत असतात,थंडी कमी होताच पुन्हा हे पक्षी आपल्या माय देशी परतण्यासाठी परतीचा प्रवास करतात. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)
साधारणपणे फेब्रुवारी महिन्यांत यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. अशाच परतीच्या प्रवासात असलेल्या उत्तर अमेरिकेतील रेड नेक फॅलेरॉप या पक्षाचे पालघरमध्ये दर्शन झाले आहे. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)
एरवी या पक्षाची पिसे ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची दिसतात पण जेव्हा हा पक्षी विणीचा हंगामात येतो तेव्हा ह्या पक्षाच्या पिसांना लाल रंग येऊ लागतो. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)
छातीवरील पिसांना देखील राल रंग येण्यास सुरुवात होते. विणीच्या हंगामात ह्या पक्षाचे दर्शन पालघर मध्ये प्रथमच झाले आहे. या पक्षाला पक्षी निरीक्षक प्रवीण बाबरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)
या आधी हा पक्षी पालघर जिल्ह्यातील चिंचणी मधील उथळ पाणथळ भागात 30 ऑक्टोबर 2016 रोजी त्याच्या नेहमीच्या हंगामात पहिला गेला होता. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)
विणीच्या हंगामात हा पक्षी अधिकच आकर्षक दिसत असल्या कारणामुळे ह्या पक्षाला पाहण्यासाठी पक्षी मित्र हजेरी लावत आहेत. ( फोटो क्रेडिट - प्रवीण बाबरे, पक्षी निरीक्षक)