In Photo | शनी अमावस्येनिमित्त भाविकांनी फुलणाऱ्या शनीशिंगनापूर आणि श्री क्षेत्र नस्तनपूर येथे शुकशुकाट
शनी अमावस्येनिमित्ती भाविकांची गर्दी होणारं नाशिकमधील नांद येथील श्री क्षेत्र नस्तनपूर आणि अहमदनगरमधील शनीशिंगनापूर येथे आज शुकशुकाट पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनीशिंगनापूर येथील शनी मंदिरातही आज शुकशुकाट आहे. भक्तांविना शनी अमावस्या साजरी होत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मंदिर आज बंद आहे. कालपासूनच शनी देवाचे मंदिर बंद आहे.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली असून कोरोनाची साडेसाती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. मंदिर बंद असल्याने भाविक नसले तरी शनी चौथऱ्यावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 10
दर्शनाला आलेल्या भाविकांचा त्यामुले हिरमोड होत असून रस्त्यावरूनच शनीदेवाचे दर्शन घ्यावे लागतेय. e 11
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपूर येथे आज शनी अमावस्येनिमित्त भरणारी यात्रा नाशिक जिल्ह्यातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. 3
शनी अमावस्येच्या निमित्ताने लाखो भाविक शनी देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
मात्र नाशिक जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने गर्दी करण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव साजरे करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे ट्रस्टच्या विश्वस्तांनी आज होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पिंपरखेड येथील एका भाविकांकडून शनी मंदिर गाभाऱ्यात द्राक्षांची आरास लावण्यात आली असून संस्थानच्या परंपरेनुसार केवळ तीन ते चार भाविकांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे पालन करून महाअभिषेक व पूजा करण्यात येणार आहे.