पाहा फोटो: कोकणात आढळली कासवाची नवी प्रजाती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागातल्या सध्या मोठ्या प्रमाणात कासवांचं संवर्धन केले जात आहे. वेंगुर्ले तालुक्यातल्या वायंगणीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सागरी कासवांचे संवर्धन सुरू आहे. या भागात कासवांच्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, लॉंग लेदर, होक्स बिल प्रजाती आढळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र प्रथमच वायंगणी समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही प्रजातींचे एकत्र जनुकीय गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळली आहे.
कासवांच्या या नव्या प्रजातीचे जनुकीय विश्लेषण केले तर नवी प्रजाती समोर येईल असं कासव अभ्यासकांचं मत आहे.
ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही जातींच्या कासवांच्या संकरातून ही नवी प्रजाती जन्माला आली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
जनुकीय विश्लेषण झालं तर कासव संशोधन आणि संवर्धनात महत्त्वाची भर पडेल. तसेच ही अनोखी प्रजाती या भागात सापडल्यामुळे तिला या गावाचं म्हणजे वायंगणी गावाचं नाव द्यावं अशी तज्ज्ञ, कासव मित्र आणि ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
ग्रीन टर्टल कासव असते तर त्याचे मागचे पुढचे पाय, पोटाकडचा संपूर्ण भाग तसेच मान आणि डोळे पांढरे दिसले असते. पण तसं न दिसता या पिल्लामध्ये फक्त पुढच्या पायाच्या कडा आणि पोटाकडचा थोडासा भाग आणि कडा एवढा भाग पांढरा असल्याचे दिसून येते. उर्वरीत शरीर हे काळसर राखाडी रंग असलेल्या ऑलिव्ह रिडले सारखे दिसते.