PHOTO : गोंदियात पक्षांसाठी मातीचे थंडगार पाणवठे, सायकल संडे ग्रुपचा पुढाकार
वाढत्या तापमानाचा चटका मनुष्यास पक्ष्यांना देखील बसतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांच्या पाण्यामुळे मृत्यू होऊ नये म्हणून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने गोंदिया शहरात तीन हजार थंडगार मातीचे पाणवठे लावण्यात आले आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्यात तापमान 48 अंश सेल्सिअसच्या वर जाते.
परिणामी शहरातील नैसर्गिक पाणवठे आटतात. त्यामुळे पक्षी शहराकडे धाव घेत असल्याचं दिसतंय.
शहरात आलेल्या पक्ष्यांचा पाण्याअभावी मृत्यू होऊ नये म्हणून गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने पुढाकार घेण्यात येतोय.
मागील तीन वर्षा पासून गोंदिया शहरातील बागेत तसेच शासकीय कार्यालय, मंदिरं ,विश्राम गृह ,वसाहतीतील झाडांवर हे मातीचे पाणवठे लावण्यात येतात.
या पाणवठ्यांच्या माध्यमातून पक्ष्यांचा थंडगार पाणी मिळणार आहे.
आज याची सुरुवात गोंदियाच्या शुभस बागेतून करण्यात आली आहे. तर जे लोक सकाळी या बागेत फिरण्यासाठी येतास अशा लोकांना या पाणवठ्यात पाणी टाकण्याचे आवाहन सायकल संडे ग्रुपच्या वतीने करण्यात येतंय.
गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकरी राजेश खवले यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
त्यामुळे तुम्ही देखील आपल्या घरासमोरील झाडावर किंवा छतावर एका मातीच्या भांड्यात पाणी ठेवून पक्ष्यांचे पाण्याअभावी होणारे मृत्यू टाळण्यास मदत करा.