Sharad Pawar Resignation: शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय; सभागृहात एकच गोंधळ!
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांची मुरलेला राजकारणी अशी ओळख आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक धक्कादायक निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. असाच निर्णय आज त्यांनी जाहीर केला आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं.
मुंबईतील वाय बी सेंटर इथे 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) या शरद पवारांच्या (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.
त्यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि सभागृहात एकच गोंधळ उडला.
शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला.
इतकंच नाही जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना ते ढसाढसा रडू लागेल.
शरद पवारांचं (Sharad Pawar) आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. पुस्ताचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला
आपण एकत्र काम करणारं आहोत. मी केवळ पदावरून बाजूला होतोय : शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिनखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं
निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, जयंत पाटील यांना अश्रू अनावर