Navratri 2022 : चौथ्या माळेनिमित्त रुक्मिणी माता सजली सरस्वती मातेच्या रूपात
आज शारदीय नवरात्रीचा चौथ्या माळेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेला सरस्वती मातेचे बैठे रूप साकारण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरस्वती मातेच्या रूपात सजवताना रुक्मिणी मातेला नवरत्नांचा हार, जडावाचे बाजूबंद जोड, खाद्याची वेणी , तन्मणी, दशावतारी हार, मोर जोड, ठुशी, शिंदे सरकार हार परिधान करण्यात आला आहे.
सोन्या मोत्याची तानवड जोड, चंद्र, मोत्यांचा कंठा , बाजीराव गरसोळी , मण्या मोत्याच्या पाटल्या जोड , मोत्यांचे मंगळसूत्र, रूळ जोड, तारा मंडळ , कर्णफुले जोड, मोठी नथ , सोन्याची ठुशी , बाजूबंद , शिंदेशाही ठुशी , हिरवी पाचूची चिंचपेटी अशा तब्बल 22 पारंपरिक रत्नजडीत दागिने परिधान करण्यात आले आहेत.
रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी नेसविण्यात आली असून तिला बैठे रूपात दाखवण्यात आले आहे.
रुक्मिणी मातेच्या मागे मोरपंख ठेवण्यात आले आहेत.
आज विठुरायाला देखील 18 प्रकारच्या विविध हिरे मोत्यांच्या अलंकाराने सजवण्यात आले आहे.
नवरात्री निमित्त हिरेजडित विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमांना सुरुवात झाली झाली.