In Pics | शारदीय नवरात्रीच्या पहिल्या माळेला रुक्मिणी मातेला पारंपारिक अलंकारांचा विशेष साज
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या माळेला आज रुक्मिणी मातेला पारंपरिक दागिन्यात मढविण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पहिल्या माळेला रुक्मिणी मातेला नखशिखांत सोन्याने मढविण्यात आले आहे यात सोन्याचा मुकुट, वाक्या जोड , तानवड जोड, तोडे जोड, जवेंच्या तीन माळा , हायकोल , पुतळ्याची माळ , मोहोरी माळ , बोरमाळ , जवमणी पदक , चिंचपेटी , कंबर पट्टा आणि सरी अशा पारंपरिक मौल्यवान सुवर्ण दागिन्याने मढविण्यात आले आहे.
विठुरायालाही नवरात्रीनिमित्त खास ठेवणीतील अलंकार घालण्यात आले आहे.
यात मस्तकी सोन्याचा मुकुट , कंठी कौस्तुभ मणी, कपाळी निळाचा नाम, मोत्याचा तुरा , दंड पेट्या , हिऱ्याचे कंगन, गळ्यात सात मोत्यांच्या कंठ्या , कानाला मत्स्य जोड, पायात तोडे , सोन्याच्या तुळशीची माळ, शाळीग्राम हार , मारवाडी करदोडा आणि सोन्याचे पितांबर असे अलंकार घालण्यात आले आहेत
अनेक महिन्यांनंतर राज्यभरातून आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे हे सोन्याने मढलेले रूप पाहण्याची संधी आली आहे.
आता रोज नऊ दिवस रुक्मिणी मातेला विविध रूपात सजविण्यात येणार असून यावेळी विठुराया देखील रोज नवीन रूपात भाविकांना दिसणार आहे .
नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजच्याच मुहूर्तावर राज्यभरातल्या मंदिरांची दारं उघडली आहेत. त्यामुळे देवाच्या दर्शनाचा सोहळा याची देही याची डोळा भाविकांना आता अनुभवता येणार आहे.