Navratri special : नवरंग; नवतारका!
पहिला दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळ्या रंगाच्या साडीत अमृता खानविलकर अगदी सुंदर दिसतीये, कपाळावर टिकली आणि मोठे कानातले तिचा लूक पूर्ण करतायत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसरा दिवस: नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. प्राजक्ता हिरव्या भरजरी साडीत अगदी उठून दिसतीये, पिंक रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साडीलाही कॉम्प्लिमेंट करतोय..
तिसरा दिवस: तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाला तपकिरी रंग आवडतो. राखाडी रंगाच्या कॉटन साडीमध्ये सई खूप ग्लॅमरस दिसतीये.
चौथा दिवस: चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंगाचा ड्रेस आणि हिरव्या रंगाच्या ओढणीत मृण्मयीचा महाराष्ट्रीयन लूक एकदम खुलून दिसतोय..
पाचवा दिवस: पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढऱ्या रंगाच्या साडीत मृण्मयीचा पारंपरिक लूक खूपच सुंदर दिसतोय..
सहावा दिवस: सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंगाची साडी सोनालीवर खुलून दिसतीये..
सातवा दिवस: सातव्या दिवशी कालरत्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग प्रत्येकालाचं उठून दिसतो, प्रार्थनाचा हा लूक सर्वांच्या पसंतीस उरतोय.
आठवा दिवस: आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे. डोळ्यांनी घायाळ करणारी मानसी गुलाबी साडीत मनमोहक दिसतीये
नऊवा दिवस: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नऊव्या सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवीला जांभळा रंग आवडतो. महाराष्ट्राची लाडकी सून तेजश्रीला जांभळी साडी खुलून दिसतीये