300 वर्षांची परंपरा, दसऱ्यानिमित्त येवल्यात भरला अश्वांचा बाजार; देशभरातील अश्वप्रेमीकडून अश्वांची खरेदी
अश्व खरेदीसाठी विविध राज्यांसह देशभरातून अश्व खरेदीसाठी अश्र्वप्रेमी येवल्यात दाखल झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेवला शहराचे संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी 300 वर्षांपूर्वी अश्वांचा हा बाजार सुरू केला होता.
दरवर्षी दसऱ्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी हा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो.
त्यामुळे या दिवशी अश्वांच्या खरेदीसाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
अवघ्या दहा हजारांपासून ते सहा लाखापर्यंत अश्वांना बाजारात मागणी होती.
या बाजारात मारवाडी, काठीयावाडी, सिंधी, लोकरे आदी अश्र्वांच्या जातीसह घोडे होते
स्थानिक शेतकऱ्यांनी भीमथडी घोडे देखील मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणलेले होते.
अश्वांना सजविण्यासाठी लागणारे खोगीर, टांगा व इतर साहित्य देखील मोठ्या प्रमाणात विकले जाते.
बाजारात साडे सहा लाखला सर्वात महगडा घोडा विकला गेला..