Nashik Rains : दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
28 Jul 2023 08:31 AM (IST)
1
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दारणातून विसर्ग वाढवण्यात आला असून सकाळी 7 वजाता दारणा धरणातून 8300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
3
आज सकाळी नऊ वाजता पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार असून 10 हजार 514 क्युसेकने विसर्ग होणार आहे.
4
विसर्गाच्या पार्श्वभूमीवर दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
5
दरम्यान नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. गंगापूर धरणात 63 टक्क्याहून अधिक जलसाठा आहे.
6
नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.