PHOTO : 110 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पोलीस भवनाचे छत पहिल्याच पावसात कोसळलं
नागपुरात एकशे दहा कोटी खर्चून उभारलेले पोलीस भवन ही दिसायला तेवढेच भव्य दिव्य. मात्र, एका पावसाने या भव्य दिव्य महालाची पोलखोल केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवारी झालेल्या पावसामुळे या इमारतीचे फॉल सिलिंगचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.
नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या पोलीस भवनाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन 29 एप्रिलला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडले.
मात्र केवळ 26 दिवसानंतर अवघ्या अर्धा तास बरसलेल्या पावसाने आणि मध्यम स्वरूपाच्या वाऱ्याने या इमारतीची आतून वाईट अवस्था केली.
काल संध्याकाळी चार ते साडेचार दरम्यान बरसलेल्या पावसामुळे पोलीस भवनाच्या दोन्ही विंगमध्ये पहिल्या, तिसऱ्या चौथ्या आणि सहाव्या माळ्यावरचे फॉल्स सिलिंग खाली कोसळले.
सुदैवाने यात कोणताही कर्मचारी जखमी झाले नाही. मात्र, उद्घाटनाला अवघे 26 दिवस झालेल्या इमारतीत असे काही घडू शकेल याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चौकोनी स्वरूपात बांधलेल्या या इमारतीच्या मधल्या भागात मोकळी जागा आहे. याच मोकळ्या जागेच्या वरती (सहा मजल्यांच्यावर) डोम बनवण्यात आले आहे.
त्या डोममधून इमारतीत नैसर्गिक उजेड आणि वारा खेळता राहावा यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. त्याच जागेतून वादळाच्या वेळेला वारा आत शिरून अवतीभोवतीच्या सहाही मजल्यांवर वारा शिरतो अशी शक्यता आहे.
मंगळवारच्या पावसानंतर ज्या-ज्या मजल्यावर फॉल्स सिलिंग खाली पडली आहे, त्या ठिकाणी दुरुस्तीचे कार्य सुरु करण्यात आले आहे.
कंत्राटदार आणि बांधकाम तज्ज्ञ इमारतीत सोसाट्याचा वारा आत शिरणार नाही यासाठी काय उपाय योजतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.