एका छोट्या वाडीतील साध्या लग्नाची गोष्ट
आत्तापर्यंत आपण अनेक शाही विवाहसोहळे पाहिले असतील....पण हा विवाह सोहळा देखील एखाद्या शाही सोहळ्या पेक्षा कमी नाही.....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा विवाहसोहळा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील आसगाव पैकी चुरणीचा वाडा या गावात पार पडला...
गल्लीतील रस्त्यावरून शेणसडा. दोन्ही बाजूने वेलीदार काढलेली पांढऱ्या रंगाची रांगोळी..
मोठ्या शामीयाना ऐवजी झावळ्याच्या मंडप... त्याला रंगीत तिकोनी पताकांची ओळ....नवरीच्या भावाने बुट्टीत तांदळात कुंकुवात घुसळन तयार केल्या अक्षता...
लग्नात ना वाजंत्री...ना फटाके... ना फोटोग्राफर... गावातीलच दत्त मंदिरात पूजाअर्चा करणाऱ्या भार्गव मामानं म्हटल्या आक्षता....
उभयतांवर अक्षता पडताच उपस्थितांनी टाळ्यावाजून दोघांना शुभेच्छा दिल्या ....नवरा-नवरीच्या सौंदर्यात भरपाडण्यासाठी , मांगल्याचे दोन हार आणि गुच्छ यापलीकडे कोणत्याही गोष्टी नाही.
पाहुण्यातील एका हौशी तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये नवरानवरीची टिपलेली छायाचित्रे....
मंडपाच्या समोर मातीवर दोन्ही बाजूला पंगत.... शाकाहाकारी जेवणात सुट्टा भात, तरतरीत आमटी,मसालेदार मिक्स भाजी, शिरा आणि विशेष म्हणजे आंब्याच्या फोडींपासून बनवलेले ताजं लोणचं....
दोन पंक्तीत जेवणावळी उठल्या....
शेणसडा ,पांढऱ्या रंगाची रांगोळी, तिकोनी पताका,साध्या पध्दतीने केलेली सजावट... या व्यतिरिक्त कोणताही थाट नाही...लवाजमा नाही, अवाजवी खर्च नाही. भटजी नाही मुहूर्त नाही,वाजंत्री-फटाके नाही,स्पीकर नाही,फोटोग्राफर नाही अत्यंत साधेपणाने पार पडलेले लग्न.....