एक्स्प्लोर
सावधान! महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाची शक्यता
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. त
Maharashtra Weather (PC : Weather Twitter)
1/10

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे.
2/10

काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, 11 फेब्रुवारी (रविवार) पर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली.
3/10

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
4/10

मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा एकूण 10 जिल्ह्यात 11 व 11 फेब्रुवारी (शनिवार व रविवार) ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
5/10

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यात 9 10 आणि 11 फेब्रुवारीला (शुक्रवार ते रविवार) पावसाची शक्यता आहे.
6/10

विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी (शनिवार ते बुधवार)ला विशेषतः 10 ते 11 फेब्रुवारी(शनिवार व रविवारी)'ह्या दिवशी पावसाची शक्यता अधिकच जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
7/10

मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात आकाश केवळ निरभ्रच राहण्याची शक्यता आहे. सध्या जी काही थंडी पडत आहे, तशीच थंडी जाणवणार आहे. पावसाची शक्यता मात्र जाणवत नसल्याची माहिती माणिकराव खुळ यांनी दिली आहे.
8/10

विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
9/10

वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात येत आहे.
10/10

11 फेब्रुवारी (रविवार) पर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली.
Published at : 08 Feb 2024 04:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
सोलापूर
धाराशिव
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
