उन्हात बाहेर पडताय? सावधान! IMD चा उद्यापासून तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, कुठे अलर्ट दिलेत, पहा

राज्यात होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे . फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता .
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात सध्या प्रचंड उष्ण तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत . 9 ते 11 मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई,ठाणे पालघर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे .

दरम्यान राज्यभरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाडा तापला आहे .
बहुतांश ठिकाणी 36 ते 40°c ची नोंद होत आहे .मुंबई उपनगर ,सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे.
ढील काही दिवस इशान्येकडील वारे सक्रीय झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या शहरात पूर्वेकडील वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचं हवामानतज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यात पुढील 24 तासात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात आज किमान तापमानातही वाढ झाल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले .
कोकणात उष्णतेच्या लाटेपासून दूर राहण्यासाठी दुपारच्या वेळी उन्हात न जाणे ,बाहेर जाताना डोके झाकणे ,भरपूर पाणी पिणे ,सुती सैल कपडे वापरणे अशा काही आवश्यक तत्त्वांचे पालन करण्याचं आवाहन IMD ने केले आहे.