Santosh Deshmukh Case: आरोपींनी हाल हाल करुन मारलं, संतोष देशमुखांनी शेवटचं एकच सांगितलं, म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यावर आता त्यातील एकेक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकतील अशा गोष्टी समोर येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब माझाच्या हाती लागलीय. आपलं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा सल्ला देशमुखांनी आपल्या लेकीला दिला होता असं जबाबात म्हटलंय.
बाबांच्या (संतोष देशमुखांच्या) विनवणीनंतरही आरोपींनी कसलीही दयामाया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करीतच राहिले, असं वैभवी देशमुख म्हणाली.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्वाचे ठरले आहेत.
कराड, चाटे, घुले टोळीच्या दहशतीबाबत जबाबातून माहिती पुढे आली आहे. हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती गोपनीय जबाबातून हाती लागली आहे.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात हा जबाब अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा? कूठे? आणि कधी? रचला हे स्पष्ट झाले.
वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे. हे देखील या जबाबामधून स्पष्ट झाले आहे.