Shivrajyabhishek Din 2021 : जीव वाहतो जीव लावतो, जीव रक्षितो ऐसा राजा; रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण, कोरोनाच्या सावटामुळं शिवभक्तांना रायगड यंदाही गाठता आलेला नाही.
असं असलं तरीही पंरपरागत अभिषेक आणि इतर सर्वच प्रथा मात्र मोजक्या उपस्थितांच्या हजेरीत पार पडला आणि रायगडावर पुन्हा शिवरायांच्या नावाचा जयघोष झाला.
छत्रपती शिवरायांचे 13 वे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजेरी लावली.
यावेळी त्यांचे पुत्रही त्यांच्यासोबत होते.
यावेळी विधीवत पूजा आणि महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक घालण्यात आला.
गडावर वाहणाऱ्या वाऱ्याचा झोतही महाराजांच्याच नावाचा गजर करत होता, असंच वातावरण यावेळी पाहायला मिळालं.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या चिरंजीवांनीही महाराजांच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतले.
सदर कार्यक्रमानंतर प्रजाहितदक्ष राजा, छत्रपती शिवरायांना अभिवादन करत संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली स्पष्ट भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं.