Shivrajyabhishek Din In Pics : काळोख्या रात्री तळपली शिवतेजाची तलवार
छत्रपती शिवाजी महाराज
1/8
किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाईची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती श्री संभाजीराजे यांचे कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार
2/8
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने रायगडावर दररोज अर्पण होत आहेत 5 पुष्पहार
3/8
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर कल्याणचे लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे.
4/8
मेघडंबरी आणि होळीचा माळ येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा ठिकाणी, जगदीश्वर मंदीर, समाधीस्थळ, आणि शिकराई देवी मंदीर, राजसदर यांसहित रायगडवरील विविध वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघाल्या आहेत.
5/8
काळोख्या रात्रीमध्ये शिवतेजाची ही तळपती तलवार पाहून अंगावर काटाच येतो.
6/8
मागील शिवजयंती उत्सवात देखील डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. याच धर्तीवर याहीवेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावरील वास्तू नेत्रदीपक रोषणाईने करण्यात आली आहे.
7/8
या कार्याची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती श्री संभाजीराजे यांचे कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून किल्ले रायगडवर दररोज 5 पुष्पहार अर्पण होत आहेत.
8/8
छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर व होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा, शिरकाई देवी मंदीर, जगदीश्वर मंदीर, आणि समाधी स्थळाला रोज 5 पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवजयंती पासून सुरू केला आहे.
Published at : 06 Jun 2021 07:19 AM (IST)