माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम किती झाले? पाहा फोटो
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्हिडीओ दाखवत मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज्यकर्ते, प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या असे आवाहन राज यांनी उपस्थितांना केले.
अनधिकृत बांधकाम माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यापासूनच्या किनाऱ्यापासून जवळ आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनदेखील जवळ असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मागील दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
संविधान, कायदे मानणाऱ्या मुस्लिमांना हे अनधिकृत बांधकाम मान्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.
येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहीमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी उघडकीस आणलेल्या या अनधिकृत बांधकामामुळे राजकारण तापणार असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे यांनी अनधिकृत बांधकाम उघडकीस आणल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.