Photo : विभागीय आयुक्तांचे निर्देश अन् जिल्हाधिकारी पोहचले बांधावर, पाहा फोटो
मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असताना देखील, मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अल्पप्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन 22 मार्चपर्यंत विभागातील पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देताच, स्वतः जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Aastik Kumar Pandey) यांनी कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला.
अवकाळी पावसामुळे कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला आहे.
तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत, त्या पंचनाम्यांचीही पाहणी करुन उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे संबंधिताना निर्देश दिले.
यावेळी कन्नड तालुक्यातील पिशोर, पळशी, रामनगर, साखरवेल परिसरातील तुकाराम हुनमंत निर्मळ, सर्जेराव गिरजाबा नलावडे, श्रीमती कमलबाई कैलास गायकवाड, नारायन बंडु डहाके, आदि शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतींची जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली.
शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी धीर दिला.