भेगाळलेली जमीन, कोरडेठाक नदी-तलाव; मराठवाड्याच्या दुष्काळकथांनी महाराष्ट्र सुन्न!
सध्या मराठवाड्यात उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. दुसरीकडे याच मराठवाड्यात सध्या दुष्काशसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक नद्या, तलाव सध्या कोरडे पडले आहेत. या भागात ज्या धरणांतून पाणी मिळायचे आता तीच धरणं सध्या पूर्ण भेगाळली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतालुक्यातील ढेकू मध्यम प्रकल्पाचीही सध्या अशीच स्थिती झाली आहे. हे धरण कोरडेठाक पडले आहे. या धरणातील जमिनीवर अक्षरश: भेगा पडल्या आहे. या धरणात नजर जाईल तिथपर्यंत फक्त भेगाळलेली जमीनच दिसत आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या अनेक ग्रामपंचायतीचा पाणीउपसा बंद पडला आहे. या प्रकल्पातून आजूबाजूच्या 15 ते 20 गावाला पाणीपुरवठा होतो, त्यामुळे धरणातच पाणी नसल्यामुळे या गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
मराठवाडा-विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदीचीही सध्या अशीच स्थिती आहे. या नदीमध्ये नजर जाईल तिथपर्यंत फक्त भेगाळलेली जमीनच दिसत आहे. पैनगंगा नदी आता कोराडीठाक पडली आहे.
या नदीच्या भरवशावर मराठवाडा आणि विदर्भातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली असते.
शेतकरी याच नदीच्या भरवशावर उन्हाळी पीक घेत असतात. परंतु आता ही नदी कोरडीठाक पडली आहे.
विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातून ही नदी जाते. मात्र आता या नदीत पाणी नसल्यामुळे आजूबाजूला बसलेल्या गावांची बिकट परिस्थिती झाली आहे.