भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
देशाची राजधानी दिल्ली हे देशातील सर्वात चांगलं शहर आहे. त्यानंतर, कर्नाटकची राजधानी बंगळुरू तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा नंबर लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत पुणे शहर सातव्या स्थानावर असून चेन्नई, कोची आणि कोलकाता शहराचा अनुक्रमे 4, 5 आणि 6 वा क्रमांक लागतो. तर, त्रिशूर हैदराबाद आणि कोझीकोडे यांचा अनुक्रमे 8,9 आणि 10 वा क्रमांक लागतो.
अर्थव्यवस्था, मनुष्यबळ, राहणीमान, पर्यावरण आणि प्रशासन व्यवस्थेबाबत ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने मंगळवारी जाहीर केलेल्या 1000 जागतिक शहरांच्या क्रमवारीत भारतीय शहरांमध्ये दिल्लीने पहिला क्रमांक मिळविला आहे.
देशाची राजधानी दिल्लीने देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला अनेक बाबींमध्ये मागे टाकले असले, तरी पर्यावरणाबाबत दिल्लीची स्थिती मात्र वाईट असल्याचे अहवालात म्हटले आहे.
1000 शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी 350 व्या क्रमांकावर, मुंबई 427व्या, तर पुणे 534व्या स्थानी आहे.
महाराष्ट्रातील नागपूर (744), वसई-विरार (748), अमरावती (815),नाशिक (826), छत्रपती संभाजीनगर (842), सोलापूर (848), कोल्हापूर (877) आणि सांगली (943) क्रमांकावर आहे.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकातून ही आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये, भारतीय शहरं माघे सरकल्याचं दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर शहर सर्वात खालच्या म्हणजे 100 व्या स्थानावर आहे. जागतिक शहरे निर्देशांकात 163 वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या जगातील 1000 प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला आहे.