Santosh Deshmukh Beed Morcha: बीडच्या भूमिपुत्रासाठी रस्त्यावर जनसागर, महिलाही आक्रमक; आक्रोश मोर्चाला तुफान गर्दी, माणसं किती?
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये देशमुख कुटुंबिय सहभागी झाले आहेत. या विराट मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.
बीडमधील मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नागरिकांकडून अनेक जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत.
सुरेश धस, बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीराजे, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार, मेहबूब शेख या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
संतोष देशमुख त्याप्रकरणातील आरोपीला अटक करा, अशा घोषणा देण्यात येत आहे.