Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malegaon Namaj : और जमीन पर बारिश अताह फरमा... पावसासाठी मालेगावात नमाज पठण
ऑगस्ट महिना संपत आला तरी नाशिक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव आदी भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती आहे.
अशातच पाऊस पडावा यासाठी मालेगावात विशेष नमाज पठण करत अल्लाहला साकडे घालण्यात आलं.
चांगला पाऊस पडावा, सगळीकडे शेत शिवार फुलावे, नद्या, धरणे तुडूंब भरुन वाहावे यासाठी नमाज पठण करण्यात आलं.
'या अल्लाह हमारे गुनाह को कबूल कर, हमारी गलतियो को माफ कर दे..और जमीन पर बारिश अताह फरमा..असे साकडे विशेष नमाज पठणात अल्लाहला घालण्यात आले.
पावसाला आळवणी करण्यासाठी 'जमितुल उलेमा' च्या वतीने या विशेष नमाज पठण आयोजित केले.
यामध्ये नाशिकच्या मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी पावसासाठी विशेष दुवा पठण केले.
मालेगावच्या पोलीस कवायत मैदानावर आयोजित या नमाज पठणावेळी 50 हजाराहून अधिक मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालेगावमध्ये याआधीही 'ऑल इंडिया सुन्नी जमीअतुल इस्लाम' च्या वतीने विशेष दुवा पठण करुन पावसासाठी अल्लाहला साकडे घातले होते.
12 ऑगस्ट रोजी मुंशी शहा दर्गा येथे आयोजित कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत पावसासाठी विशेष दुवा पठण केले होते.
मौसम नदी काठावरील दर्गापर्यंत यावेळी मिरवणूकही काढण्यात आली होती.