Tiger Death : 'Big Daddy of Tadoba' वाघाचा मृत्यू
चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिध्द 'वाघडोह' वाघाचा मृत्यू झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा गावाशेजारी असलेल्या जंगलात आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
वाघडोह हा वाघ त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमेच्या खुणेमुळे 'scare face' या नावाने आणि 'big daddy of tadoba' म्हणून देखील प्रसिध्द होता. (फोटो क्रेडिट- निखील तांबेकर)
वाघडोह हा ताडोबातील किमान 40 पिल्लांचा पिता होता. 40 पेक्षा जास्त पिलांचा पिता, अतिशय मोठा आकार आणि नेहमी कुटुंबासोबत राहत असलेल्या या कुटुंबवत्सल वाघाला त्यामुळेच big daddy of tadoba हे नाव पडले होते.
ताडोबा ला जागतिक कीर्ती मिळवून देण्यात वाघडोहचा सिंहाचा वाटा होता. (फोटो क्रेडिट- अभिषेक देशमुख)
म्हातारा आणि अशक्त झाल्यामुळे 'वाघडोह' ला तीन वर्ष आधी इतर वाघांनी ताडोबातून हुसकावून लावले होते आणि तेव्हा पासून त्याचा चंद्रपूर शहराजवळील जंगलात वावर होता.