Maharashtra Zilla Parishad Elections 2021 | महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी, मतदानासाठी मतदारांचा उत्साह!
नंदुरबार जिल्ह्यात मतदानासाठी मतदार बाहेर पडत आहेत, मात्र वर्षोनुवर्षे मूलभूत सुविधा मिळत नसल्याने समस्या कायम आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना शहरातील केंद्रीय विद्यालय या जवळील धान्य गोडाऊन येथे साहित्याचे वाटप करण्यात आले.
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाची यासाठी संपुर्ण तयारी झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होताये. 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. वाशीम जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. सगळ्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचारी मत यंत्र आणि इतर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना होत आहेतय मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता सगळ्या कर्मचाऱ्याच्या RTPCR टेस्ट केल्या जात आहे
नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक