Mahatma Gandhi | महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन तरुणाची पायी जगभ्रमंती! पहा जगभरातील फोटो

नितीन सोनवणे हा अवघ्या तीस वर्षांचा मराठी तरुण गांधी विचारांनी प्रेरित होऊन पायी जगभ्रमंती करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नितीन सोनवणे हा अवघ्या तीस वर्षांचा मराठी तरुण गांधी विचारांनी प्रेरित होऊन पायी जगभ्रमंती करत आहे.

आतापर्यंत 46 देशांमधून पंचवीस हजार किलोमीटर पायी प्रवास करत तो दिल्लीत पोहोचला आहे.
ऑक्टोबर 2016 ते 2021 या पाच वर्षांच्या काळात त्याने हा सगळा प्रवास केला आहे.
वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमापासून नितीने त्याच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
कधी सायकलने तर कधी पायी चालत हा सगळा प्रवास त्याने केला आहे.
अवघ्या 30 वर्षीय नितीन सोनवणे गेल्या 5 वर्षांपासून महात्मा गांधींच्या शांततेचा संदेश जगभरात पोहोचविण्याचे काम करत आहे.
नितीन मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राशीन गावचा. नितीनचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण कर्जत येथील हे महात्मा गांधी महाविद्यालयीत झाले.
पुढे पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच त्याला नोकरीही लागली; परंतु यात तो अधिक रमला नाही. सामाजिक कार्याचा उदात्त हेतू बाळगून एका नव्या जीवशैलीच्या शोधात नितीन निघाला.
यादरम्यान त्याचा परिचय 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी' या संस्थेशी झाला. या संस्थेच्या माध्यमातून अनेक मान्यवर व्यक्तींच्या सहवासात नितीनमध्ये महात्मा गांधींच्या विचारांची प्रेरणा रुजली.
याच प्रेरणेने भारावून त्याने महात्मा गांधींचा अहिंसेचा व शांतीचा संदेश जगभरात पोहोचविण्याचा निर्णय घेतला.
खरंतर घरची हलाखीची परिस्थिती बघता नितीन अभियंता झाल्यावर आपल्याला घराला हातभार लावेल, अशी नितीनच्या आईची आशा होती. परंतु नितीनचा हा निर्णय व त्यामागची प्रेरणा लक्षात घेता मोठ्या धीराने त्याच्या आईनेही त्याला या कार्यासाठी परवानगी दिली.