In Pics : पैठणीवर रवि वर्मा यांनी साकारली जगप्रसिध्द पेंटिंग
पैठणी म्हटले डोळ्यासमोर येते ते नाशिक जिल्हयातील येवला शहर.केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार येवल्याची पैठणी प्रसिध्द आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पैठणीवर चेतन धसे या विणकराने प्रसिध्द चित्रकार रवि वर्मा यांनी काढलेली जगप्रसिध्द पेंटिंग चक्क पैठणीवर साकारली आहे.
येवल्यात अनेक घराघरात पैठणीच विणकाम केले जाते. केवळ पैठणी वर पारंपारिक पध्दीतीची विणकाम न करता अनेक विणकर वेगवेगळे प्रयोग करीत पैठणीच विणकाम करीत असतात.
यापुर्वी पैठणीवर जंगल आणि त्यात असणारे विविध प्राणी तर कधी शेल्यावर साईबाबा,नरेंद्र मोदी अशा विविध प्रकारचे विणकाम केलेल्या पैठणी पाहिल्या असतील.
चेतन धसे याने मात्र प्रसिध्द चित्रकार रवि वर्मा यांचे अनेक पेंटिंग पाहिल्यानंतर जगप्रसिध्द झालेली शकुंतला या महिलेची प्रतिकृती पैठणीवर साकरण्याचे ठरवले.
साधारण पवणे दोन महिन्याचा कालावधीत या पैठणीसाठी लागला. कारण हुबेहुब चित्र पैठवणीवर साकारणे सुध्दा जिकरीच होते.
त्यासाठी तशा रंगांच रेशीम सुध्दा उपलब्ध नसल्याने त्या त्या रंगाचे रेशिम रंगात रंगवून घ्यावे लागले.
तयार झालेल्या पैठणीला साधारण दीड ते पावणेदोन लाख रुपयाची किंमत मिळावी अशी अपेक्षा चेतन याने व्यक्त केलीय.