हवामानाची नेमकी परिस्थिती काय?
राज्यात कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या देशातील हवामानात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडी आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे.
2023 च्या एल-निनो वर्षात दर वर्षासारखी थंडी नाही. यावर्षी ती कशी वळण घेऊ शकते, हे बघणेही गमतीशीर आहे.
8 डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याच्या थंडीला जरी सुरुवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
सध्या दिवसा थंडी वाजत असून, त्यामानाने पहाटेचा गारवा कमीच असल्याची माहिती खुळे यांनी दिली.
विदर्भ वगळता, कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे 27 डिग्री से. ग्रेडच्या तर विदर्भात 25 डिग्री से. ग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे.
निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाशाला अडथळा नाही. सूर्यप्रकाश भरपूर असला, तरीदेखील ह्या दिवसात दिवसाची लांबीही कमी असते. म्हणूनच खालावलेल्या कमाल तापमानामुळं दैनिक सापेक्ष आर्द्रताही सरासरीपेक्षा खुप आणि खुपच घसरलेली आहे.
सध्याचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी असावयास हवे. तरच चांगली थंडी जाणवते. परंतू, यावर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे 17 डिग्री से. ग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे
काही भागात अवकाळी पाऊस देखील पडत आहे.