राज्यातील 'या' भागात जोरदार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसाचा काही भागात शेती पिकांना (Agriculture Crop) देखील फटका बसत आहे.
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आलाय.
या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात हवामानाविषयी सविस्तर माहिती.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (Imd), राज्याच्या विविध भागत अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकणातील काही भागात जोरजार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
राज्यात पुढील चार दिवस जोरदार वादळी पावसाची शक्यता कायम आहे. 12 ते 13 मे या काळात अहमदनगर नाशिक पुणे सातारा बीड परभणी जालना छत्रपती संभाजी नगर या भागात दुपारनंतर जोरदार ते मुसळधार वादळी विजांसह पावसाची शक्यता आहे.