बारामतीत घरावरील पत्रे उडाले, शेतातील झाडे वाकली; अवकाळीनं बळीराजावर संकट
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
Rain in baramati
1/7
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
2/7
पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, हिंगोली जिल्ह्यासह बेळगावमध्येही पावासाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे नेत्यांच्या प्रचारसभा सुरू असताना दुसरीकडे पावसानेही मारा केला
3/7
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, ऊसशेती इतरही दोडका, भोपळा उत्पादक शेतकऱ्यांच्या पीकांवर पाणी फेरलंय.
4/7
बारामती तालुक्यातील बाबुर्डी परिसरातही सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.
5/7
सोसाट्याच्या वादळीवाऱ्याने गावातील चार शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.घरातील वस्तूंचे व अन्नधान्य भिजल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
6/7
वादळीवारे मोठया प्रमाणावर असल्याने गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय वादळीवाऱ्याने वीजचे खांब मोडल्याने गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
7/7
बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिल्याल्याची माहिती दिली.
Published at : 11 May 2024 09:44 PM (IST)