महाराष्ट्रातील हवामान कसं असणार?
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, उद्यापासून (7 डिसेंबर) राज्यातील वातावरण कसं असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण आहे. तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा 6 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून म्हणजे 8 डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळून थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील तीव्रतेत जाऊन महाराष्ट्र भू-भागावर वळणारे कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकून समुद्रातच विरळण्याची शक्यता आहे.
सोमवार म्हणजे 11 डिसेंबर ते बुधवार दिनांक 13 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अपेक्षित किरकोळ पावसाची शक्यताही आता मावळली असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
उत्तर भारतात सध्या एकापाठोपाठ प्रवेशणारे पश्चिमी झंजावात, त्यातून पडणारा पाऊस आणि बर्फबारीमुळं तेथील सकाळची दृश्यता खालावली असून तिथे थंड वातावरण आणि धुके जाणवत आहे.
शुक्रवारपासून (8 डिसेंबरपासून) सुरु होणाऱ्या थंडीला अडथळाही आता दूर होऊन पूरकता मिळू शकते.
महाराष्ट्रातील फळबागांना होणारा धोका, लाल कांदा काढणी, उन्हाळ कांदा लागवड यासारख्या शेतकामांसाठीची गैरसोयही टळू शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळामुळं देशातील काही राज्यात पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश, चेन्नई, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.