PHOTO : मनोज जरांगेंच्या सभेसाठी तब्बल 31 क्विंटलचा पुरी-ठेचा
जरांगे यांच्या सभेसाठी येणार्या बांधवांसाठी तब्बल 31 क्विंटल पुरी-ठेचा तयार करण्याचे काम हिंगोलीतील लाखकर ग्रामस्थांनी सुरू केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔंढा नागनाथ तालुक्यातील लाखकर येथील सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या सभेसाठी 31 क्विंटलचा पुरी-ठेचा वाटण्याचा निर्णय घेतला होता.
या अनुषंगाने मंगळवारपासून गावातील शेकडो महिला, पुरूषांनी पुरी-ठेचा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
यासाठी 31 क्विंटल आटा, 10 क्विंटल तेल, चार क्विंटल मिरची, एक क्विंटल लसण, 50 किलो जिरे असे सर्व साहित्य वापरण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून संपूर्ण गाव एकत्रित येऊन यासाठी मेहनत घेत आहेत. बुधवारी पुरी-ठेच्याचे पॉकेट करून रात्री सभास्थळी नेऊन ठेवण्यात येणार आहेत.
त्यानंतर गुरूवारी चार ठिकाणी अन्नछत्र लावून या अल्पोपहाराचे वाटप केले जाणार आहे.
लाखकरांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे संपूर्ण अन्नछत्राचा कार्यक्रम पार पडत असून सभास्थळी एकूण 300 क्विंटलचे अन्नछत्र ठेवण्यात आले आहे.
त्याचबरोबर 4 लाख पाणीबॉटल व 50 टॅंकरद्वारे फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच, खिचडी, पुरीठेचा, चपाती ठेचा, चिवडी, उपमा अशा प्रकारे 300 क्विंटलचे अन्नछत्र राहणार असून, याशिवाय बिस्कीट पुडे व केळीचेही वाटप करण्यात येणार आहे.