Weather : पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नाही
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) जाणवत आहे. कुठे उन्हाचा कडाका आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे.
मागील दोन दिवस हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात अवकाळी पावसाचा (unseasonal rain) अंदाज वर्तवला होता. मात्र, आजपासून (1 एप्रिल) पुढील 5 दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली.
जरी काही भागात ढगाळ वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे खुळे म्हणाले.
हवामान विभागानं महाराष्ट्रात 30 आणि 31 मार्चला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणं राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं.
आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता जाणवत नाही. त्यामुळं काढणीला आलेल्या पिकांची शेतकऱ्यांनी काढणी सुरु करावी असे आवाहन देखील खुळे यांनी केलं आहे.
दरम्यान, 6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील ( बुलढाणा, वर्धा नागपूर जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील 4 जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात वातावरणात बदल जाणवत आहे.
आजपासून संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे म्हणाले.
2 एप्रिलपासून दुपारच्या तापमानात काहीशी वाढ होत असली तरी येत्या 15 दिवसापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही