Photo: छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात दोन गटात वाद
आज संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या ओहर गावात (Ohar Village) देखील गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री झालेल्या वादानंतर आज सकाळी या गावात दगडफेकीची घटना घडली आहे.
यात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पोलिसांनी तत्काळ गावात धाव परिस्थिती नियंत्रणात आणली असून, गावात सर्वत्र सध्या शांतता पाहायला मिळत आहे.
तर खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ओहर तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरापासून 12 किलोमीटर असलेल्या ओहर गावात देखील रात्री राम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद झाला होता.
रात्री झालेला वाद त्यावेळी मिटवला गेला. पण सकाळी पुन्हा दोन गटात दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या या गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.