राज्यातील विविध जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
देशात मान्सूनसाठी (Monsoon) पोषक वातावरण तयार झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये (Keral) दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे.
1 ते 5 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाच्या शक्यता आहे. 1 ते 5 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा 1 ते 5 जूनदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही डख यांनी वर्तवला आहे.
दरम्यान, मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबतची माहिती देखील पंजाबराव डख यांनी दिली आहे. 8 जूननंतर राज्यात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे.
1 ते 5 जूनदरम्यान राज्यात चांगल्या पावसाचा इशारा पंजाबराव डखांनी दिला आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
सुरुवातीला राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, बीड परभणी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, संगमनेर, नाशिक, जालना, यवतमाळ, धुळे जळगाव या भागात 1 ते 5 जूनदरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे.
पू्र्व विदर्भात देखील 6 7 9 जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे.