Pen Exhibition in Kolhapur : कोल्हापुरात अवतरला हिऱ्यांची सजावट केलेला तब्बल सात लाखांचा पेन! जगभरातील ब्रँडचा नजराणा

सुंदर हस्ताक्षर कागदावर साकारणारे जागतिक स्तरावरील विविध ब्रँडच्या पेनची अनोखी दुनिया कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विशेष म्हणजे हिऱ्यांची सजावट केलेला तब्बल सात लाखांचा पेन या शोमध्ये पाहायला मिळाला.

अक्रेलिक, कॉपर, डायमंड कोटेट, मेटल आणि सोन्याची नीट असलेले पेन देखील या ठिकाणी उपलब्ध होते.
पहिल्यांदाच कोल्हापुरात भरवलेल्या पेन शोला कोल्हापूरकरांनी अबूतपूर्व प्रतिसाद दिला.
या पेन शोमध्ये सर्वात जास्त शाईच्या विविध पेनची रेंज होती.
इतकंच नाही, तर फाउंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन याची रेंज देखील मोठी होती.
अगदी एक दोन रुपया पासून सुरू झालेला पेनचा प्रवास हा आता लाखो रुपयात तसेच विविध रूपात पोहोचला आहे.
हा पेनाचा प्रवास पाहण्याची संधी पहिल्यांदाच कोल्हापूरकरांना मिळत आहे.
जगभरातील 50 हून अधिक नामांकित ब्रँडच्या पेनाचे प्रदर्शन सध्या कोल्हापुरात भरलं आहे.
या प्रदर्शनात दोनशे रुपयांपासून ते 7 लाख रुपयापर्यंतच्या विविध आकाराचे पेन आहेत.
तसेच दुर्मिळ शाई पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध आहे.
शाई पेनची अजूनही क्रेझ असल्याचे या निमित्ताने दिसून आले.