राज्यात थंडीचा जोर वाढला
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यात थंडी जाणवणार
पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 10 ते 12 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असू शकते.
मुंबईसह कोकणात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यंत पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 26 डिग्री से. ग्रेड म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकतात.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सध्या 19 ते 23 जानेवारी पर्यन्तच्या पुढील 5 दिवसात पहाटेचे किमान तापमान हे 14 ते 16 डिग्री से.ग्रेड असण्याची शक्यता.
थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या दिसत आहेत.
सध्या राज्यात कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही.
विदर्भात 23 जानेवारीनंतर 3 दिवसासाठी म्हणजे 25 जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल.