PHOTO : अश्विन पौर्णिमेपासून तुळजाभवानी सिंहासनावर आरूढ, तुळजापुरात आकर्षक सजावट
तुळजाभवानीची मंचकी निद्रा संपून अश्विन पौर्णिमेपासून पुन्हा एकदा देवी सिंहासनावर आरूढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानिमित्तानं पुणे येथील भक्त आर किराड यांनी तुळजाभवानी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
देवीचरणी पौर्णिमा पौर्णिमेपासून फुल रुपी सेवा अनेक भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे फुलाच्या सजावटीच्या माध्यमातून निसर्गरम्य वातावरणाची थीम तयार करण्यात आली आहे.
यात फुलपाखरे वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असल्याचं दाखवला आहे.
राजे शहाजी महाद्वार समोर श्री तुळजाभवानी मातेची सुवर्ण अलंकृत फुलांची दहा फुटाची प्रतिमा हे या सजावटीचे मुख्य आकर्षण आहे.
या देवीच्या प्रतिमेसमोर भाविक नतमस्तक होत आहेत या आकर्षक फुलाच्या सजावटीसाठी साठ कामगारांनी 48 तास सलग काम केला आहे फुलाच्या सजावटीसाठी 12 टन देशी-विदेशी फुलांचा वापर केलाय.
यात झेंडू शेवंती सह एशिया, थोरियम, ऑर्किड, डच गुलाब यासारखी विदेशी फुलं आहेत.
गेल्या पाच वर्षापासून आर आर किराड हे देवीच्या चरणी फुल रुपी सेवा करत आहेत.
भक्तांच्या गर्दीने तुळजापूर नगरी फुलून गेली आहे.