कोजागिरी पौर्णिमेनिमित वाळवा तालुक्यातील वाटेगावमधील वासुदेव मंदिर एक हजार दिव्यांनी उजळले
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधील वासुदेव मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा तब्बल एक महिना चालणारा असा दीपोत्सव दरवर्षी साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपावलीच्या आगमनाची चाहूल लागते ती कोजागिरी पौर्णिमेपासूनच.
अगणित पणत्या, समया, रंगमाळा, दीपमाळा, टांगते कंदील असे अनेक प्रकारचे पितळेचे दिवे रोज रात्री लावले जातात.
रोज एक हजार दिव्यांनी मंदिर आणि मंदिर परिसर उजळून निघतो.
रोज एक हजार वाती तीन ते चार किलो तेल यासाठी वापरले जाते. गाभाऱ्यामध्ये तुपाचे दिवे लावले जातात.
हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविक मंदिरामध्ये गर्दी करत असतात.
भोगावती नदीकाठी उत्तराभिमुख असणारे हे मंदिर 200 वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे.
गावातील दिवेकर कुटुंबाचे हे देवस्थान असून मंदिराचा मंडप हा पूर्णत: लाकडी आहे. शांत हास्यमुद्रा असणारी वासूदेवाची मूर्ती ही पंचधातूची आहे.
देवाच्या पूजा चर्चेचा मान हा दिवेकर कुटुंबाचा आहे. (सर्व फोटो - दिनेश दिवेकर , वाटेगाव)