Rain : राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळं अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही भागात जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज संपर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या कोकणसासह विदर्बात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईसह उपनगर ठाणे परिसरातही जोरदार पाऊस सुरु आहे.
सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे.
काही भागात पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यामुळं काही मार्ग बंद करण्यात आले आहेत.