Rain Photo : अवकाळी... शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, गारपीटीनं पीकं आडवी!
राज्यात सामान्यांना एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरं जावं लागत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलं आहे. आज पहाटे मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यासह विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) शहर आणि तालुक्यातील परिसरात 18 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. पावसामुळे कारंजा इथल्या बाजार समितीच्या आवारात असलेला शेतमाल भिजला.
परभणीच्या सोनपेठ आणि पालम तालुक्यात काल रात्री काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला.
गारपीटीसह पाऊस झाल्याने काढून ठेवलेल्या गहू, ज्वारी या पिकांबरोबरच आंबा व इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाशिम जिल्ह्यातही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचं पहायला मिळालं.
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील उखळी,वडगाव,निळा यासह आसपासच्या 10 ते 12 गावांमधील पिकांचे नुकसान झाले आहे
काही जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये या वातावरणामुळे काळजी निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्यानंही गारपीट, पावसाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरासह इतर पिकांची कापणी करून घेण्याचे कृषी विभागाने आवाहन केलं आहे.
सध्या राज्यातील विविध भागात शेतात ज्वारी, गहू , हरभरा, संत्रा, फळभाज्या अशी पीक आहेत. ज्वारी, गहू, हरभरा काढणीला आले आहेत. वादळ, पावसामुळ या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.