शेतकऱ्यांची वीज तोडता मग ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च कशासाठी : भाजप
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च, भाजपचा आरोप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या कोट्यवधींच्या उधळपट्टीवर भाजपचा आक्षेप
पैसे थकीत राहिल्याने शेतकऱ्यांची वीज तोडता मग बंगल्यावर खर्च कशासाठी-भाजप
राज्यात महावितरणकडून वीजबिल थकीत करणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचं सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीवर कोट्यवधींचा खर्च केला जातोय.
याचे फोटो आणि व्हिडिओ भाजपनं प्रसिद्ध केले आहेत.
सरकारकडे रिनोव्हेशनच्या खर्चासाठी पैसे आहेत. मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत? असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जामंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावर अद्याप तरी महाविकास आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया आलेली नाही.
मात्र, येणाऱ्या काळात या खर्चावरुन नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.