Maharashtra Rain PHOTO: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा, शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानं खूप मोठं नुकसान झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी देखील झाली आहे.
बीडमधील धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात आसोला येथील शेतीचे खचून प्रचंड नुकसान झाले.
परळी तालुक्यातील शिरसाळा परिसरामध्ये या चौकडी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले तर धारूरच्या घाटामधल्या नदीचे पात्र भरून वाहताना पाहायला मिळालं.
बीडमध्ये धारूर तालुक्यात अवकाळी झालेल्या पावसाने छोट्या नदी नाल्यांना पाणी आले आहे.
बीडमधील धारूरच्या घाटामधल्या नदीचे पात्र भरून वाहताना पाहायला मिळालं. धारूर घाटातील तलाव अर्धा भरला..
जाहागीर मोहा येथे शेतीची मशागत करण्यासाठी गेलेला टेलर व जीप नदीच्या प्रवाहात वाहून गेले फळबागांचेही नुकसान झाले.
सांगोला परिसरात गारांचा पाऊस झाला. पंढरपूर रोड, बुरांडे वस्ती, सावंत वस्ती, बिलेवाडी व सांगोला परिसरात जोरदार गारांचा पाऊस झाला.